*कहाणी सोमवारची फसकीची:-
ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्यांत गरीब सवाशीण बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणमास आला, म्हणजे काय करावं? दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्याव. एक उपडा दुसरा उताणा पसाभार तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावं पूजा करावी, नंतर प्रार्थनेच्या वेळी 'जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी,' असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं.
असं चारी सोमवारी तिनं केलं. शठकर तिला प्रसन्न झाला. दिवसोंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठविला. आणि आपल्या व्रताची समाप्ति केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला- अजून तुल नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
13 years ago
2 comments:
खुप दिवसांनी ऐकले, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, लहानपणी आईबरोबर देवासमोर बसुन गोष्टी ऐकायचो.. अजुन असतील तर टाका ना
ok day by day i am fiding
Post a Comment