
हनुमानापासून काय शिकायचे तर त्याचा विनम्रपणा. शक्तीशाली असूनही विमन्रता त्याच्यात होती. म्हणूनच तो अत्युच्चपदाला पोहोचला. केवळ भुजात बळ आहे, म्हणून दादागिरी करणार्या आजच्या 'बलभीमांनी' हनुमंताकडून ही गोष्ट आवर्जून शिकली पाहिजे. एखादी बलवान व्यक्ती कुणापुढे झुकत असेल तर तो नक्कीच विनम्रपणा समजावा. बुध्दी व बळ यांचा संयोग त्याच्या ठिकाणी असतो, हे लक्षात घ्यावे.
श्रीराम व सुग्रीव यांचे कोणतेच काम हनुमानाशिवाय पूर्ण होत नव्हते. हनुमान दोन्ही हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहत असत. रावणाने हनुमानाच्या नम्रतेला लाथाडून त्याच्याशी चार हात करण्याची हिंमत दाखवली आणि त्याला आपली सोन्याची लंका जळालेली बघावी लागली.
बुद्धी व शक्ती यांच्या मीलनापुढे कुणाचेही काहीही चालत नाही. भारतीय संस्कृतीत दोन महावीर मानले जातात. ते म्हणजे हनुमान व वर्धमान. एक परम भक्त तर दूसरे अहिंसेचे पुजारी. अहिंसकतेशिवाय भक्ती अशक्य आहे. 'जय हनुमान' म्हटल्यानेही संकट, भीती दूर झाल्यासारखे वाटते.
अंजनी पुत्र : सुमेरु पर्वताचे राजा केसरी हे हनुमानाचे पिता होते. अंजना ही माता असल्याने हनुमानाला अंजनी पुत्र म्हटले जाते.
पवन पुत्र : हनुमानाला पवनपुत्रही म्हटले जाते. वायुला मारूत म्हटले जाते. मरूत म्हणजे वायु. त्यावरून हनुमानाला मारूती असे म्हटले जाते. पवनाच्या वेगासमान हनुमानामध्ये उडण्याची शक्ती असल्याने पवनपुत्र असेही म्हणतात.
हनुमान : इंद्रदेवाच्या वज्रप्रहाराने हनुमानाची हनुवटीला जबर मार लागला होता. तेव्हापासून पवनपुत्राचे नाव हनुमान म्हणून प्रचलित झाले होते.
बजरंगबली : वज्राला धारण करणारे व वज्रासारखे टणक अर्थात बलवान शरीर असलेल्या हनुमानाला बजरंगबली (बजरंगबली) असे म्हटले जाऊ लागले.
श्रीमारुतिस्तोत्र:-
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुति
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥
महाबळी प्राणदाता, सकंळा उठवी बळें ।
सोख्यकारी दःखहारी, दुत वैश्ण्वगायका ॥
दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता, भव्यसिंदुरलेपन ॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा, पुरातना ।
पुण्यवंता,पुण्यशीला, पावना परितोशका ॥
ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोट्ला पुढे ।
काळाग्नी , काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥
ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भुरकुटी,ताठिल्या- बळें ॥
पुछ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंड्लें बरीं ।
सुवर्णकटिकासोटी,घंटा किंकिणि नागरा ॥
ठकारे पर्वताऐसा, नेट्का सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविध्युल्लतेपरी ॥
कोटिच्या कोटि उड्डाणें, ज़्हेपावें उत्तरेकडे ॥
मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥
अणुपासोनी ब्र्म्हांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमांदार धाकुटे ॥
ब्र्म्हांडाभोंवतें वेढे, वज्रपुछए करुं शके ।
तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सुर्यमंड्ळा।
वाढ्ता वाढता वाढे, भेदिलें शुन्यमंडळा ॥
धनधान्य्पशुवृध्दि, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती परुपविद्यादि, स्तोत्रपाठें करुऐयां ॥
भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तहि ।
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।
हे ध्ररा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ॥
दृढदेहो निसंदेहो सैख्या च्न्द्रकळागुणें ॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू ।
रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोश नासती ॥
।। इति श्रीरामदासक्रुत संकटनिवारसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥