I made this widget at MyFlashFetish.com.

Thursday, February 5, 2009

श्रीरामभारतीय संस्कृतीत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून श्रीरामाकडे पाहिले जाते. 'मर्यादा पुरूषोत्तम' हे विशेषण त्यामुळेच श्रीरामाला दिले जाते. श्रीरामाला भगवान विष्णूचा सातवा अवतार मानतात. आयोध्याचा राजा दशरथ व कौसल्या यांचा राम थोरला मुलगा. त्याला लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न हे तीन सावत्र भाऊ होते. जनक राजाची कन्या सीता त्याची पत्नी. दशरथ राजाची पट्टराणी कैकयीने आपला मुलगा भरत याला आयोध्येचे राज्य मिळावे यासाठी रामाला १४ वर्षे वनवासात पाठवले. ही १४ वर्षे रामाने पत्नी सीता व धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्याबरोबर घालवली. या काळात त्याने जंगलातील ऋषींना त्रास देणारया अनेक असूरांचा वध केला. रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत बंदिवासात ठेवले. तेव्हा तिला सोडवण्यासाठी व रावणाचा वध करण्यासाठी राम लंकेत गेला. या काळात रामाला हनुमान भेटला. हनुमानाच्या वानरसेनेची मदत घेऊन त्यांनी लंकेवर आक्रमण केले व रावणाचा वध केला. सीतेची सुटका केली. वनवास भोगल्यावर श्रीरामाचे पुन्हा अयोध्येत आगमन झाले. गुढ्या उभारून लोकांनी त्याचे स्वागत केले. त्यामुळे तो दिवस गुडीपाडवा म्हणून साजरा केला जातो. या काळत सर्वत्र आनंद, शांती, भरभराट होती. श्रीरामाच्या जीवनावर वा‍ल्मिकी ऋषिंनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

No comments: